Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात! 'चौकशी करुन गुन्हा दाखल करा', दिव्यांग कल्याण आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Pooja Khedkar : ट्रेनी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पूजा खेडकर यांनी आयएएस बनण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली असून ⁠पुजा खेडकर यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करा, अशा आदेशाचे पत्र राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रविण पुरी यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या आईचे अनेक कारनामे समोर येत आहेत. आएएस बनण्यासाठी पुजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. याबाबत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी मोठा निर्णय घेत पुजा खेडकर यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करा असे पत्र पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

Ashadhi Ekadashi Mahapuja : पंढरपुरात विठू नामाचा गजर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न

दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे काही दिव्यांगांनी पुजा खेडकर यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे अपंग कल्या आयुक्तांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे. ⁠खोटे दिव्यांग प्रमाणपत्रावर शासकीय नोकरी मिळवली असल्यास, असे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यावर आणि प्रमाणपत्र देणाऱ्या डॅाक्टरांची चौकशी करुन गुन्हा दाखल करावा पंग प्रमाणपत्र देणार्यांचे रॅकेट असल्यास त्यांचीही चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्रातून केली आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अँटी चेंबर मिळवण्यासाठी केलेला खटाटोप, त्यावरून वडिलांनी टाकलेला दबाव, आई मनोरमा यांचे पिस्तुलाने धमकावणे, ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा, ऑडी कारवर लावलेला अंबर दिवा तसेच पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर बाबींचा प्राथमिक अहवाल येत्या काही दिवसात सादर केला जाणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply