Political News : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; पक्षबांधणी आणि प्रशासकीय कामातील हुकमी एक्का शिंदेंच्या शिवसेनेत

मुंबई : राज्यात शह-काटशहचे राजकारण सध्या सुरु आहे.शिवसेनेच्या ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचं शिंदे गटात इनकमिंग अद्यापही सुरुच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचे व प्रशासकिय कामातील माहितगार मारूती साळुंखेंनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.मारूती साळुंखे हे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या जवळचे मानले जातात. शिवसेना संघटना बांधण्यात व प्रशासकिय कामात मारूती साळुंखे यांचा महत्वाचा वाटा असल्याचे बोलले जाते. 

मारूती साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्ष बांधणीच्या कामात बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षप्रवेशावेळी बोलून दाखवला. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे व माजी नगरसेविका शितल म्हात्रे या उपस्थित होत्या.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *