Political News : राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांचा तलवारीने हल्ला

मुंबईच्या ताडदेव भागात काल (सोमवारी) रात्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 3 कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तिघांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ताडदेव पोलिसांनी याप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, हल्ला कुणी केला? हल्ल्यामागील नेमके कारण काय?, हे अद्याप समजू शकलेले नाही.

मुंबईच्या ताडदेव भागात सोमवारी (3 एप्रिल 2023) रात्री एक धक्कादायक घटना घडली. ताडदेवच्या जनता नगरमधील एका बिल्डिंगमध्ये 30 ते 40 अज्ञात लोकांनी तलवारी आणि चॉपर्स घेऊन प्रवेश केला. त्यानंतर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांपैकी दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.

Follow us -

दरम्यान हल्लेखोरांकडे तलवारी, चॉपर आणि बांबू होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन जणांवर हल्ला केला. त्यामुळे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. तिघांपैकी दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर एकाच्या पायाला दुखापत झाली आहे. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेसंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पोलिसांनी हल्लेखोरांपैकी तिघांना अटक केली आहे. तर अन्य लोकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पण हल्लेखोर नेमके कोण होते? कुठून आले होते? त्यांचा हेतू काय होता? यासंदर्भात मात्र कोणतीही माहिती अद्याप समजू शकले नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply