Political News : शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या ऐतिहासिक राजकीय पेचावर आज बुधवारी (ता. १०) सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता ‘शिवसेना कोणाची’ आणि ‘ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटाचे?’ याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी चार वाजल्यानंतर सुनावणार आहेत. त्याआधीच घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये काल(मंगळवारी) मध्यरात्री महत्वाची बैठक झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे.
त्याचबरोबर या बैठकीसाठी राज्याच्या नवीन पोलीस महासंचालक रश्मी शुल्का देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. तर या बैठकीमध्ये आज योणाऱ्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकालानंतर राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
Sunil Kedar News : सर्वात मोठी बातमी! कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना जामीन मंजूर |
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष होऊ नये, शांतता रहावी यासाठी काळजी घेतली जाणार आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून काही महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्याचीही माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज ४ वाजता या निकालाचं वाचन करणार आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून अत्यंत चर्चेच्या आणि राजकीय वादाच्या ठरलेल्या या मुद्द्यावरील निकालाकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचेही लक्ष लागले आहे आमदार अपात्रतेसंदर्भात दोन्ही गटांच्या याचिकांवर १४ सप्टेंबर ते २० डिसेंबरपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांसमोर मॅरेथॉन सुनावणी झाली होती. आज विधानसभा अध्यक्ष विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करणार आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यामध्ये शिंदे गटाच्या 16 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांचा समावेश आहे.
शहर
- Kalyan: कल्याणमध्ये चमत्कार! शिंदेसेना आणि ठाकरे सेना एकत्र, कोणत्या मुद्दावर झालं एकमत?
- RCB wins IPL : पुण्यात RCB समर्थकांचा जल्लोष, एफसी रोडवर राडा, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
- Pune Crime : चोरीसाठी गाजियाबाद- पुणे विमानाने प्रवास; एटीएम कार्ड बदलून लुटमारी, आंतरराज्य टोळीतील दोघे ताब्यात
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
महाराष्ट्र
- Shirur Accident: आईसोबतचा तो प्रवास ठरला अखेरचा! भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू; २ चिमुकले गंभीर
- Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ठाकरेंची मोठी कारवाई, दिग्गजाची पक्षातून हकालपट्टी
- Maharashtra Rain : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत धो-धो, विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात; राज्यात कुठे काय परिस्थिती?
- Seat-Sharing : मुंबई, ठाण्यात महायुतीचं बार्गेनिंग सुरू, कोण किती जागावर लढणार?
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण