Political News : प्रियांका गांधी वर्ध्यातून निवडणूक लढवणार? लोकसभेसाठी काँग्रेसचा खास फॉर्म्युला!

Political News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून उमेदवारी जाहीर करावी, तसेच त्यांना मतदारसंघात कामाला लावावे, अशी मागणी काँग्रेसच्या एका गटाने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. प्रियांका गांधी-वाढ्रा यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, त्यामुळे फायदा होऊ शकतो, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध विरोधकांमध्येच नव्हे तर पक्षातील नेत्यांमध्येही तीव्र नाराजीचा सूर आहे. त्यांच्याबाबत तातडीने ठोस निर्णय घेतल्यास, सकारत्मक परिणाम दिसून येईल, अशी मागणी देखील काँग्रेसच्या गटाकडून करण्यात आली आहे.

Shiv Sena MLA Disqualification : निकाल आमच्याच बाजूने, ठाकरे गटाचे आमदारही शिंदे गटात येतील; संदिपान भुमरेंना विश्वास

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षातीतील दिग्गज नेत्यांसह १२ जणांना लोकसभा निवडणुकीत खासदारकी देण्याची मागणी देखील या पत्रातून करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्रात एकमेव निवडून आलेले खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्या जागेवर सध्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी द्यावी, असंही नमूद करण्यात आलं आहे.

दुसरीकडे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यासह युवा चेहऱ्यांमध्ये अमित देशमुख, वर्षा गायकवाड, असलम शेख, विश्वजीत कदम, सतेज ऊर्फ बंटी पाटील यानाही खासदार उतरवण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

तसेच १२ आमदारांव्यतिरिक्त माजी मंत्री आदिवासी चेहरा असलेले शिवाजीराव मोघे यांना वाशिम यवतमाळ मधून खासदारकी उमेदवारी देण्याच्या मागणी करत माणिकराव ठाकरे यांना मात्र एक प्रकारे डच्चू अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply