Police Recruitment : पोलीस भरतीला पावसाचा फटका! मैदानावर चिखल; भरती पुढे ढकलण्याची अमरावतीतून मागणी

 

Police Recruitment  : सध्या अमरावती ग्रामीण पोलिसांची महिलांची पोलीस भरती सुरू आहे. मात्र अमरावतीत मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मैदान पूर्णपणे पावसात भिजले आहे. ग्राऊंडवर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने भरती पुढे ढकलण्याची आक्रमक मागणी भरतीसाठी आलेल्या मुलींनी केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचाच फटका अमरावतीमध्ये सुरू असलेल्या ग्रामी महिला पोलीस भरतीलाही बसल्याचे पाहायला मिळाले.

Educational Certificate : विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार शैक्षणिक प्रमाणपत्रे; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पोर्टल सुरू

सध्या अमरावती ग्रामीण पोलिसांची महिलांची पोलीस भरती सुरू आहे. मात्र अमरावतीत मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे मैदान पूर्णपणे पावसात भिजले असून मैदानावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत मुलींची मैदानी चाचणी झाली तर त्यांना धावणे व इतर शारीरिक चाचणी करणे अशक्य आहे.

त्यामुळे मुलींची आजची पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सकाळी चार वाजल्यापासून मोठ्या संख्येने मुली या मैदानी चाचणीसाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या जोग स्टेडियम बाहेर जमल्या असून आजची पोलीस पोलीस भरती पुढे ढकलन्याची आक्रमक मागणी मुलींनी केली आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply