Police Bharti 2024 : पोलिस भरती प्रक्रियेत मोठा बदल, अकोल्यात १००० उमेदवारांची शारीरिक चाचणी रद्द

Police Bharti 2024 : अकाेला येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आणि आज (शनिवार) पहाटे झालेल्या पावसामुळे अकोला पोलिस दलाने पाेलिस भरती प्रक्रियेत बदल केला आहे. आजची (ता. 22 जून) हाेणारी तब्बल 1 हजार उमेदवारांची मैदानावरील शारीरीक चाचणी रद्द केली. त्यानंतर पाेलिस दलाने नवे वेळापत्रक जाहीर केले
 
पाेलिस भरती प्रक्रिया 8 जुलैपर्यंत आहे. ती एक दिवस पुढे गेली आहे. आजच्या  पावसामुळे  आज रोजी आलेल्या उमेदवारांना शारीरीक चाचणीसाठी पुढील 9 जुलैची तारीख देण्यात आली आहे. आज हजर असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी तसेच उंची व छातीचे मोजमाप घेण्यात येणार आहे.
मात्र जे उमेदवार पावसामुळे भरती प्रकीयासाठी उपस्थित राहु शकले नाहीत, त्यांची कागदपत्र पडताळणी, उंची व छाती मोजमाप व शारीरीक चाचणीची संपुर्ण प्रक्रीया 9 जुलैला घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पावसामुळे सर्व उमेदवारांची तात्पुरती थांबण्याची व्यवस्था अकोला पोलिस  लॉन येथे करण्यात आली होती.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply