PM Modi Meets Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप; व्यासपीठावर रंगला हास्यविनोद

PM Modi Meets Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.

विमानतळावरून मोदी थेट दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गेले. यावेळी त्यांनी बाप्पाचा अभिषेकही केला. दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान मोदी या दोन बड्यांमध्ये भेट झाली. यावेळी पवारांनी मोदींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार दिला जात आहे. दरम्यान, पुरस्कारासाठी मोदी व्यासपीठावर दाखल झाले. यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये हास्यविनोद रंगला जो कॅमेऱ्याने अचूकपणे टिपला.

व्यासपीठावर पोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसोबत हस्तांदोलन केलं. यावेळी शरद पवार आणि मोदींमध्ये काहीतरी गोष्टीवरून हास्यविनोद रंगला. यावेळी शरद पवार यांनी हसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. दोन बड्या नेत्यांमध्ये रंगलेला हा हास्यविनोद कॅमेऱ्याने अचूक टिपला.

PM Modi Pune Visit : मोदींकडून दगडूशेठ मंदिरात पूजा; रस्त्याच्या दुतर्फा जल्लोष करत पुणेकरांनी केलं पंतप्रधानांचं स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर येण्याआधी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, रोहित टिळक उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याला विरोध केला.

आधी मणिपूरला जा आणि मगच पुण्याला या असं म्हणत कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केलं. पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. यामुळे काही काळ शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी वेळीच आंदोलकांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply