PM Narendra Modi : आईला अग्नी देताच मोदी लगेच कामावर परतले, वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. आईचे निधन झाल्याने ते भावूक झाले होते. हीराबेन मोदी यांच्या पार्थिवावर गांधीनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शोक आवरत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कामावर हजर झाले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रोजच्या कामकाजातला कोणताही कार्यक्रम रद्द केला नाही. त्यांनी पश्चिम बंगालच्या ७८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला भेट दिली तसेच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. सदर कार्यक्रमात मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत सहभागी झाले.

या कार्यक्रमात त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित व्यक्तींना मार्गदर्शन देखील केले. " आज बंगालच्या पावन भूमीसमोर मला नतमस्तक होण्याची संधी मिळाली. बंगलमध्ये सर्वत्र इतिहासाच्या खुणा दडलेल्या आहेत. याच भूमीत वंदे मातरमच्या घोषणा देण्यास सुरूवात झाली आणि आज इथेच वंदे भारत ट्रेनला  हिरवा झेंडा दाखवला गेला.", असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी त्यांना अहमदाबादच्या यू. एन. मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. अशात उपचार सुरू असतानाच आज शुक्रवारी सकाळी त्यांची प्राण ज्योत मावळली. नरेंद्र मोदी यांनी आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यावर लगेचच आपल्या कामाला सुरूवात केली. यावेळी देशासाठी त्यांच्या मनात असलेली तत्परता भारतीयांना पाहायला मिळाली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply