PM Modi Visit To Mumbai : पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार सीएसएमटी स्थानकाच्या पुर्नविकास प्रकल्पाचे भुमिपूजन !

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. सीएसएमटीचा सध्याचा चेहरा कायम ठेवत विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी सुविधा पुरविण्याचे या पुनर्विकास प्रकल्पात भारतीय रेल्वेने हाती घेतला आहेत.

देशभरातील १४ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून त्यात सीएसएमटी स्थानकाचा समावेश आहे.सप्टेंबर २०२२ च्या अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळात अहमदाबाद, नवी दिल्लीसह सीएसएमटी स्थानकांच्या पुनर्विकास कामांसाठी एकूण दहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्यास मंजुरी दिली होती.

हा पुनर्विकास अडीच वर्षात केला जाणार आहे.सीएसएमटीचा सध्याचा चेहरा कायम ठेवत विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी सुविधा पुरविण्यासाठी पुनर्विकास प्रकल्पात प्रस्तावित आहे. ह्या प्रकल्पाला १८१३ कोटी रुपयाचा खर्च आहेत. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया १६ फेब्रुवारी रोजी खुली होणार आहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील पाच महिन्यात काम सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार सीएसएमटी स्थानकाच्या पुर्नविकास प्रकल्पाला रेल्वेकडून वेग देण्यात येत आहे. हायब्रीड बील्ड ॲापरेट पद्धतीने पुर्नविकास करण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे ४० आणि खासगीची ६० टक्के गुंतवणुक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या मुहूर्त साधत सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे. फलाट क्रमांक 18 मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफे टेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे.स्थानकात प्रवाशांसाठी प्लाझा ,रिटेल, कॅफेटेरिया, करमणूक सुविधा असतील. फूड कोर्ट, वेटिंग लाउंज, स्थानिक उत्पादनांसाठी जागा उपलब्ध केली जाणार आहे. मेट्रो, बस वाहतुकीचे केंद्रीकरण करण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply