PM Modi Oath : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार; पंडित नेहरू यांच्या ‘त्या’ विक्रमाची बरोबरी करणार

PM Modi Oath : नरेंद्र मोदी आज रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती द्रौपती मुर्मू मोदींना पंतप्रधानपदाची शपथ देतील. या सोहळ्याला अनेक देशांमधील नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ८ हजार लोक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे.

विशेष बाब म्हणजे शपथविधीनंतर नरेंद्र मोदी एक नवा इतिहास रचतील. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे ते दुसरे व्यक्ती ठरतील. याआधी पंडित नेहरू यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंडित नेहरू १९४७ ते १९६४ अशी १७ वर्षे देशाचे पंतप्रधान होते.

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली, गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

पंडित नेहरू हे सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. त्यांची लोकप्रियता अफाट होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेहरू यांनी अनेक वर्षे तुरुंगात काढली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं तिन्ही निवडणुका निर्विवाद जिंकल्या होत्या. दुसरीकडे मोदी यांचे समर्थक आजवर मोदींनाच सर्वात लोकप्रिय पंतप्रधान मानतात.

दरम्यान, नरेंद्र मोदी रविवारी शपथ घेण्यापूर्वी सकाळी ७ वाजता राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना नमन करणार आहेत. तसेच ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकावर जाऊन दर्शन घेतील. यानंतर नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय समर स्मारक येथे जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी G20 शिखर परिषदेसारखी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवन परिसरातही सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निमलष्करी दल आणि दिल्ली सशस्त्र पोलिसांच्या पाच कंपन्यांसह २,५०० पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय NSG कमांडो सुद्धा सुरक्षेत असतील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply