PM Modi In Shirdi : 'सबका मालिक एक' प्रमाणेच मोदींचा 'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र- अजित पवार

PM Modi In Shirdi : विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी पंतप्रधान मोदी शिर्डीमध्ये आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे इत्यादी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीतून लोककल्याणाचे काम करण्याची प्रेरणा मिळो अशी मी प्रार्थना करतो. मोदींनी २०१४ साली देशाचं पंतप्रधान पद स्विकारलं. त्यांनी सबका साथ, सबका विकास मंत्र समोर ठेवला होता. सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच तो आहे. मोदींची कारकीर्द पाहिली तर ते याच दिशेने जात असल्याचं दिसून येतं, असं अजित पवार म्हणाले.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा दणका, परभणीतील पिंपळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द; एकाच जागेसाठी 155 अर्ज दाखल

महाराष्ट्रानं कायम राष्ट्राचा विचार केला आहे. देशासाठी नेहमी महाराष्ट्र छातीचा कोट करुन उभा राहिला आहे. मोदी राष्ट्र बळकट करत आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. विकास आणि मोदी हे नाते घट्ट झाले आहे. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात येत आहे, असंही अजित पवार म्हणाले.

बळीराजासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा असतो. ५३ वर्ष कितीतरी वेळा निळवंडे धरणाचे उद्घाटन होऊ शकले नाही. निळवंडे येथे उद्घाटन करताना मोदी सांगत होते, पाणी बचत करा, ठिंबक सिंचनचा वापर करा, असं पवार यांनी सांगितलं.

अनेक चढउतार आपण पाहिले, पण धरण आज पूर्ण झालं आहे. ५३ वर्षांपूर्वी कोणाला वाटलं नसेल की असं धरण होईल. पण, हे काम मोदींच्या हाताने होण्याचं ठरलं होतं. ते पूर्ण झालं आहे. रेल्वेच्या संदर्भातील अनेक प्रकल्प, साईबाबाच्या दर्शनासाठी भाविकांची सोय अशा अनेक योजना सरकारकडून पूर्ण केल्या जात आहेत.

महिना पाचशे रुपये असं १२ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. आम्ही सर्व जातीधर्माचं भलं करण्यासाठी काम करत आहोत. अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेत आहोत. पुढं देखील मोदींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत राहू, प्रचंड सख्येने शेतकरी उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतो, असं यावेळी अजित पवार म्हणाले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply