PM Modi : ‘शक्ती’ला विरोध करणारे नष्ट होतील; पंतप्रधानांचा पुन्हा घणाघात; द्रमुकवरही जोरदार टीका

सालेम (तमिळनाडू) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाषणात वापरलेल्या ‘शक्ती’ या शब्दावरून आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. ‘‘आम्ही माता-भगिनींना शक्ती मानतो, त्या शक्तीला इंडिया आघाडी नष्ट करू पाहात आहे. मात्र या प्रयत्नात ते स्वत:च नष्ट होतील,’’ असे मोदी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूमध्ये होते. सालेम येथे सभा घेत मोदी यांनी राज्यातील सत्ताधारी द्रमुक पक्षावरही टीका केली. काँग्रेस आणि द्रमुक हे दोन्ही पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे राजकारण हीच या पक्षांची धोरणे आहेत, अशी टीका मोदींनी केली.

Pune Exclusive : ड्रग्ज प्रकरणी नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी; गुन्हे शाखेची पहाटेपासून कारवाई, १० पथके तैनात

यानंतर मोदी यांनी राहुल यांच्या ‘शक्ती’बाबतच्या विधानावरून काँग्रेससह इंडिया आघाडीला धारेवर धरले. मोदी म्हणाले, ‘‘इंडिया आघाडीचे नेते इतर कोणत्याही धर्माबद्दल अवाक्षरही बोलणार नाहीत. त्याचबरोबर, हिंदू धर्माचा अवमान करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. इंडिया आघाडीच्या पहिल्याच सभेत त्यांचे धोरण स्पष्ट झाले आहे.

त्यांना ‘शक्ती’ला नष्ट करायचे आहे. तमिळ संस्कृतीत शक्तीपीठांना मोठे महत्त्व असून हिंदू धर्मातही ‘शक्ती’ म्हणजे स्रीशक्ती मानली गेली आहे. याच शक्तीला काँग्रेस आणि द्रमुकला नष्ट करायचे आहे. मात्र, आमच्या महाकाव्यांमध्ये आणि प्राचीन कथांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की शक्तीला नष्ट करू पाहणारा स्वत:च नष्ट होतो.’’

‘५-जी म्हणजे पाचवी पिढी’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रमुक पक्षावरही टीका केली. जयललिता जिवंत असताना त्यांना द्रमुक पक्षाने कशी वागणूक दिली, हे सर्वांना माहिती आहे, असे म्हणत मोदींनी अण्णा द्रमुकच्या समर्थकांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मोदी म्हणाले,‘‘द्रमुकचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यांनी महिला आरक्षण विधेयकालाही विरोध केला होता.

याचमुळे तमिळनाडूमध्ये महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढत आहे. या महिलाविरोधी दृष्टिकोनाला जनतेने पराभूत करावे. ५-जी हे उच्च तंत्रज्ञानाचे प्रतीक असले तरी द्रमुकसाठी ५-जी म्हणजे ‘फिफ्थ जनरेशन’ (पाचवी पिढी) आहे. याच घराणेशाहीच्या राजकारणामुळे जी. के. मूपनार यांची पंतप्रधान बनण्याची क्षमता असतानाही काँग्रेसने त्यांना पुढे येऊ दिले नाही.’’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply