PM Modi : पंतप्रधान मोदींचं लढाऊ विमानातून उड्डाण, स्वदेशी 'तेजस'मधून हवाई पाहणी

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस लढाऊ विमानातून उड्डाण केलं आहे. त्यांनी तेजस फायटर जेटमधून उड्डाण केलं. पंतप्रधान मोदीयांनी आज बंगळुरुमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड  कंपनीला भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून हवाई पाहणी केली.

पंतप्रधानांचं तेजस लढाऊ विमानाने उड्डाण

भारतीय वायुसेनेने अधिक लढाऊ विमाने, हलकी लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या दृष्टीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी काम करत आहे, त्यामुळे HAL चर्चेत आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या बंगळुरु येथील कंपनीला भेट दिली आहे.

Pune Crime News : बायकोने केलेल्या मारहाणीत ३६ वर्षीय बिल्डरचा मृत्यू, ६ वर्षांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह

वायूदलात स्वदेशी बनावटीची विमाने

अलिकडच्या काळात भारत स्वदेशीवर भर देत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वदेशी बनावटीची विमाने वायूदलात भरती करण्यासंदर्भातही करार करण्यात आले आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचं लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर तेजस त्यापैकीचं आहे.  इतकंच नाही तर इतर देशांनीही LCH-तेजस फायटर जेट खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

बंगळुरुमधील HAL प्लांटला भेट

भारतीय हवाई दलाने आणखी लढाऊ विमाने आणि हलके लढाऊ हेलिकॉप्टर  तेस खरेदी करण्याची आणि सुखोई-30 श्रेणीतील विमानांमध्ये सुधारित करण्याची योजना जाहीर केली आहे. यामुळे वायुसेना आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या लवकरच अब्जावधी डॉलर्सचे संभाव्य करार होण्याची शक्यता आहेत. यातच आज पंतप्रधान मोदी यांनी HAL च्या बंगळुरु येथील प्लांटला भेट दिली आहे.

स्वदेशी HAL फ्रेंच कंपनी सफ्रान  कंपनी सोबत संयुक्तपणे हेलिकॉप्टर इंजिन डिझाइन आणि विकसित करण्यावर काम सुरू करणार आहे. US फर्म GE Aerospace सोबत देशात फायटर जेट इंजिनच्या संयुक्त उत्पादनासाठी करारावरही चर्चा सुरु आहे. HAL ने पूर्वी सांगितल्याप्रमाणे, लढाऊ विमाने आणि मूलभूत प्रशिक्षकांसाठी IAF च्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी LCA Mk-1A आणि हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (HTT-40) विमानांसाठी  नाशिक मध्ये नवीन उत्पादन प्लांट सुरु करण्याची तयारी सुरु आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply