PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात लवकरच जमा होणार २००० रुपये, जाणून घ्या कधी?

PM Kisan Samman Nidhi 13th Installment : देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसानचा १३ वा हप्ता कधी मिळणार? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. अशातच, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. 

केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी (PM Kisan)अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण ६००० रुपये वार्षिक मिळतात. केंद्र सरकार ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत वर्ग करणार आहे. म्हणजेच वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये पैसे पाठवले जातात. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात २००० हजार रुपये मिळतात.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता १३ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतने वाट पाहत आहे. अशातच, १३ वा हप्ता कधी मिळणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारकडून १३ व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

पीएम किसानचा १३ वा हप्ता कधी मिळणार?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता या महिन्यात बळीराजाच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेअंतर्गत तेरावा हप्ता २७ फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

पीएम किसान योजना काय आहे?

पीएम किसान योजना ही एक केंद्रीय योजना आहे, जी देशातील सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामासाठी तसेच घरगुती आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करते. शेतकर्‍यांना सन्माननीय जीवनासाठी मदत म्हणून ही योजना सुरु झाली. या योजनेच्या लाभार्थ्यांचे संपूर्ण आर्थिक दायित्व केंद्र सरकार उचलते.

खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे कसे पाहायचे?

  • प्रधानमंत्री किशन सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर जा - pmkisan.gov.in.

  • वेबसाईटच्या उजव्या बाजूला 'फार्मर्स कॉर्नर' आहे. खाली 'लाभार्थी स्थिती' टॅब आहे. त्यावर क्लिक करा.

  • नंतर 'मोबाइल नंबर' निवडा. 'नोंदणी क्रमांक' वर क्लिक करा. मग कॅप्टा द्यावा लागेल. त्यानंतर 'डेटा मिळवा' वर क्लिक करा.

  • पंतप्रधान सन्मान निधीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही हे तुम्ही पाहू शकाल.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM किसानचा लाभ

पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहेत. अशातच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे EKYC पूर्ण केले नाही त्यांना तेराव्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. OTP आधारित eKYC PM Kisan पोर्टलवर उपलब्ध आहे. बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधता येईल. eKYC ची अंतिम तारीख १० फेब्रुवारी होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply