Pimpri-Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये गावगुंडाची दहशत कायम, अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी 15 वाहनांची तोडफोड

Amit Shah Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त शनिवारपासूनच शहरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

असे असताना देखील पिंपरी चिंचवड शहरात गावगुंडाची दहशत कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या गावगुंडांनी पुन्हा वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जवळपास १० ते १५ वाहनांची तोडफोड केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटी समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर परिसरामध्ये गावगुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. या गावगुंडांनी जवळपास १०-१५ चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. काटे पेट्रोल पंप ते गोविंद गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची गाव गुंडांनी तोडफोड केलेली आहे.

काल मध्यरात्री १२ ते १ वाजता दरम्यान गावगुंडांच्या टोळक्याने हातात दगड घेऊन वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. या तोडफोडीमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी वाहनांच्या मालकांनी थेट सांगवी पोलीस ठाण्यामध्येधाव घेत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर वाहनांची तोडफोड करणाऱ्या गावगंडांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Amit Shah Pune Visit: अमित शहांच्या पुणे दौऱ्यावेळी मोठा बदल! कार्यक्रमानंतरच्या सर्व बैठका रद्द; तातडीने दिल्लीला जाणार

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गुंडांकडून वारंवार तोडफोड, मारामारी, लोकांना धमकावणे यासारखे प्रकार सुरु आहे. अशामध्ये या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दोन्ही शहरांचे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आहेत.दहशत करणाऱ्या या गावगुंडांची पोलीस धिंड काढत आहेत. तसंच त्यांना अटक देखील केली जात आहे. तरी देखील त्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र वारंवार पहायला मिळत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply