Pimpri-Chinchwad News : मुळा नदीत जेसीबीद्वारे हजारो ब्रास वाळूची तस्करी, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

Pimpri-Chinchwad News : पुणे जिल्ह्यातील मुळा नदीपात्रातून वाळू तस्करीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाळू तस्कर जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या सहाय्याने मुळा नदीच्या पात्रात मध्यरात्री वाळू चोरी करत असतानाचे व्हिडिओ मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसते की, वाळू तस्कर गेल्या कित्येक दिवसांपासून बेकायदेशीरपणे वाळू चोरून तस्करी करत आहेत. मुळा नदीतील पिंपळे निलख भागात हे घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे, जिथे ते जेसीबी आणि पोकलँड मशीनचा वापर करून हजारो ब्रास वाळू तस्करी करत होते .

विशेष म्हणजे, वाळू तस्कर हे मध्यरात्रीच्या वेळी नदीपात्रात वाळू तस्करी करत असून, त्यांना महसूल प्रशासनाचे लक्षही जात नाही. पुणे जिल्ह्यात वाळू उपसा करण्यावर पूर्णपणे बंदी आहे तरीही वाळू तस्कर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून देऊन हे अवैध कृत्य करत आहेत. या प्रकरणावर आम आदमी पक्षाचे पदाधिकारी रविराज काळे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Ratnagiri : मध्य आफ्रिकेत समुद्री चाच्यांनी बंधक बनविलेल्या खलाश्यांमध्ये रत्नागिरीतील दोन तरुणांचा समावेश

रविराज काळे यांनी या प्रकरणी पुणे जिल्हा महसूल प्रशासनाकडे लेखी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमध्ये तस्करीसाठी वापरलेली जेसीबी आणि पोकलँड मशीन तसेच डंपर ट्रक जप्त करण्याची मागणी केली आहे. यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करून, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

वाळू तस्करीचे हे प्रकरण महाराष्ट्रातील वाळू तस्करीच्या गंभीर समस्येला उघडकीस आणते. यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा प्रकारच्या तस्करीला वाव मिळत असल्याचे लक्षात येते. प्रशासनाने त्वरित कारवाई केली पाहिजे, जेणेकरून नदीपात्रातील पर्यावरण आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण होऊ शकेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply