Pimpri-Chinchwad : पिंपरी- चिंचवडमध्ये वर्षभरात ३३ घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्याना पकडले; सर्वाधिक बांगलादेशी भोसरीमध्ये!

Pimpri-Chinchwad : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या वर्षभरात ३३ घुसखोर बांगादेशींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हटलं जातं. या शहरात आणि परिसरात अनेक उद्योगधंदे आहेत. यामुळे देशातील अनेक राज्यांमधून विविध धर्माची आणि जातीची लोक शहरात वसलेली आहेत. अशातच घुसखोर बांगादेशीच प्रमाण वाढलं आहे.

पिंपरी- चिंचवड शहरांमधील म्हाळुंगे, निगडी, पिंपरी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, सांगवी, दापोडी, चाकण, तळेगाव एमआयडीसी आणि देहूरोड या परिसरात बांगलादेश आणि रोहिंग्ये यांना अटक केली आहे. सर्वाधिक बांगलादेशी हे भोसरी परिसरातून अटक करण्यात आले आहेत. भोसरी मध्ये वर्षभरात बारा बांगलादेशींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हे सर्व बांगलादेशी हे बनावट कागदपत्रांद्वारे परिसरात राहत होते. आधार कार्ड, पॅन कार्ड यासह इतर कागदपत्र ही नेहमीच या बांगलादेशकडून जप्त करण्यात आलेले आहेत.

Pune : फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *