Pimpri chinchwad crime : बनावट शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे कोट्यवधींची फसवणूक; लुबाडणूक करणारी टोळी ताब्यात

Pimpri chinchwad crime : नागरिकांना हेरून बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास लावून अनेकांची लुबाडणूक झाल्याचे प्रकार समोर आले होते. अशा पद्धतीने कोट्यावधी रुपयाची फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. 

पिंपरी चिंचवड शहर परिसरात शेअर ट्रेडिंग अँपच्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडत फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले होते. याबाबत पोलिसात तक्रार दाखल होती. यामुळे पोलीस फसवणूक करणाऱ्याच्या मागावर असताना पोलिसांनी टोळीला ताब्यात घेतले आहे. यामध्ये जुनेद मुक्तार कुरेशी, सलमान मन्सूर शेख, अब्दुल अजीज अन्सारी, आकिफ अन्वर आरिफ अन्वर खान, आणि तोफिक गफ्फार शेख असे ह्या शेअर मार्केट फॉड ट्रेडिंग टोळीतील आरोपीचे नाव आहेत. या पाचही आरोपींनी मिळून जवळपास १२० बँक अकाउंटसच्या  माध्यमातून नागरिकांची कोट्यावधी रुपयाची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आल आहे. 

Kalyan News : कल्याणमध्ये विद्यार्थी-तरुण ड्रग्जच्या विळख्यात, महिलेला अटक करत साडेपाच लाखांची ब्राऊन शुगर जप्त

मुद्देमाल केला हस्तगत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या टोळीकडून पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर सेलने ७ लाख रुपये रोख रक्कम, ७ मोबाईल फोन, १ कॅश काउंटिंग मशीन, वेगवेगळ्या बँकेच्या ८ डेबिट कार्ड, १२ वेगवेगळ्या बँकेची चेक बुक्स आणि पंजाब नॅशनल बँकेचे १ पासबुक असा मुद्देमाल जप्त केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply