Pimpri Chinchwad Corporation : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या टेंडर घोटाळ्याची ईडीकडून दखल

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड महापालिकेतील आरोग्य विभागात दोन वर्षांपूर्वी रस्ते सफाईसाठी काढण्यात आलेल्या सुमारे २२० कोटी रुपयांच्या टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानुसार टेंडर घोटाळ्याची दखल आता थेट अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने घेतली आहे. 

पिंपरी  चिंचवड महापालिकेत सन २०२१- २२ या वर्षी आठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य विभागाने दैनंदिन रस्ते व गटर साफसफाईच्या कामासाठी २२० कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. या टेंडर प्रक्रियेसाठी लावण्यात आलेले नियम धाब्यावर बसवून काही ठेकेदारांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक संबंध जपून कामे दिल्याचा आरोप रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरोदे यांनी सुरुवातीला पिंपरी चिंचवड महापालिका, राज्याचे नगर विकास विभाग आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडे केला होता. मात्र सुरुवातीला या २२० कोटीच्या टेंडर घोटाळ्याची दाखल पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतली नाही, कि पिंपरी चिंचवड शहर पोलीस प्रशासनाने घेतली.  

Nashik : नाशिक हादरलं! जमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याला जिवंत जाळलं; निफाड तालुक्यातील घटना

दरम्यान या प्रकरणात रयत विद्यार्थी परिषदेचे तक्रारदार सूर्यकांत सरोदे यांनी ईडीकडे या विषयाची थेट तक्रार केली होती. यानंतर ईडीने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणात तक्रारदाराने एफआरसी कॉपी आणि चार्जशीट पाठविण्याच्या सूचना ईडीने केल्या आहेत. मात्र या प्रकरणात आम्हाला अजून ईडीकडून कोणतीच नोटीस आली नाही; असा दावा पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वतःहून पुढाकार घेत एफआयआर दाखल करून त्याची प्रत ईडीकडे पाठवावी; अशी मागणी सूर्यकांत यांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply