Pimpri-Chinchwad News : लंडन ब्रिजवरुन ८० वर्षीय महिलेची आत्महत्या, पवना नदीत उडी मारुन आयुष्य संपवलं

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये एका ८० वर्षाच्या महिलेने नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन महिलेचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला आहे. या महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेने पवना नदीवरील लंडन ब्रिजवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नदीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

ATM Crime : सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारून एटीएम फोडले; १४ लाख रुपये घेऊन चोरटे फरार

पवना नदीमध्ये उडी मारुन स्वत:चा जीव संपवणाऱ्या या ८० वर्षाच्या महिलेची ओळख पटवण्याचे काम रावेत पोलीस करत आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर अहवालाच्या मदतीने या महिलेचे नाव शोधण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत. या आत्महत्येच्या प्रकरणामुळे पिंपरी चिंचवड शहर परिसरात खळबळ माजली आहे.


दरम्यान या महिलेने ८० व्या वर्षी आत्महत्या का केली? या वयात त्यांनी हा निर्णय का घेतला? या महिलेने खरंच आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी रावेत पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. वायसीएम रुग्णालयातून शवविच्छेदनाचा अहवाल येण्याची वाट पोलिस पाहत आहेत.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply