Pimpri Chinchwad : पत्नी की भाऊ ? चिंचवडमध्ये लक्ष्मण जगतापांच्या घरात कोणाला तिकीट, चर्चांना उधाण

Pimpri Chinchwad : राज्यातील रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात चिंचवडमध्ये लक्ष्मण जगतापांच्या घरात कोणाला तिकीट मिळेल? या चर्चेला उधाण आलं आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून २७ फेब्रुवारीला मतदान तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांच्या कुटुंबातीलच व्यक्तींना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे पत्नी अश्विनी जगतापदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे.दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप  यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे अस बोलले जात आहे. अद्याप भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नसती तरी शंकर जगताप यांचे नाव आघाडीवर आहे.

लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांचे निटवर्तीय मानले जायचे. त्यामुळे बंधु शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली तर राष्ट्रवादी भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच दुर्धर आजराने निधन झाले आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी जगताप कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले होते.तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगताप कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply