Parliament Security Breach : एकाच आधार क्रमांकावर तीन जणांनी नव्या संसदेत घुसण्याचा केला प्रयत्न अन्...; घटनेने खळबळ

Parliament Security Breach : नव्या संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था भंग करून तीन कामगारांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नव्या संसद भवनात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन कामगारांना अटक करण्यात आली आहे. या कामगारांनी एकाच आधार कार्डचा वापर करून प्रवेश केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

पुन्हा एकदा देशाच्या संसदेच्या सुरक्षेचा भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तिघांनीही एकाच आधारकार्डचा वापर करून संसद भवनात प्रवेश घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 4 जून रोजी IG-3 गेटमधून मोनिस आणि कासिम यांनी वैयक्तिक फोटो असलेला एकच आधार कार्ड क्रमांक 763767140501 दाखवला.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती खरी म्हणून वापरली. संसदेच्या सुरक्षा पथकाने त्यांची कागदपत्रे तपासली असता, समान आधार क्रमांक असलेल्या तीन वेगवेगळ्या लोकांचे फोटो आढळून आली, त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा पद्धतीने संसदेत घुसण्याचा प्रयत्न झाला .

Pune Crime News : अग्रवाल पिता-पुत्रांचे पाय आणखीच खोलात; चंदननगर पोलिसांत नवा गुन्हा दाखल

कासिम, मोनिस आणि शोएब अशी त्यांची नावे असल्याचे दिल्ली पोलिसानी सांगितले. या तिघांविरुद्ध भारतीय दंड सहितेच्या विविध कलमातर्गत बनावटगिरी आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 जून रोजी सीआयएसएफने तीन जणाना अटक केली, त्यानंतर चौकशीनंतर त्यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, 4 में रोजी दुपारी 1.30 वाजता बनावट आधार कार्ड वापरून गेट क्रमांक 3 मधून प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यापूर्वीही संसदेच्या सुरक्षेचा झालेला भंग

पोलिसानी कलम ४११/४६५/४६८/४७१/१२०बी अन्वये एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. संसदेच्या सुरक्षेचा भंग करण्याचा प्रयत्न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गतवर्षी 13 डिसेंबर रोजीच सुरक्षा भंगाची मोठी घटना उघडकीस आली होती. गेल्या वर्षी 13 डिसेंबर रोजी लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन लोकांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती. दोघांनी पिवळा धूर पसरवला होता. यावेळी नीलम आझाद आणि शिंदे यांनी संसदेच्या आवारात घोषणाबाजी केली. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार 4 जून रोजी सीआयएसएफने तीन मजुरांना पकडले, त्यानंतर चौकशीनंतर त्यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल आहे. हे कामगार कुठून आले होते, त्यांचा घुसखोरीमागे नेमका काय हेतू होता? या सगळ्याची चौकशी करण्यात येणार आहे. मात्र या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply