Parliament Budget Session 2023 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा, ६६ दिवस चालणार अधिवेशन

Parliament Budget Session 2023 Dates Announced : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. ३१ जानेवारीपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ एप्रिलपर्यंत म्हणजेच ६६ दिवस चालणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखेच्या घोषणेकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. आता ती प्रतीक्षा संपली आहे. ३१ जानेवारीपासून संसदेचे  अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. ६ एप्रिलपर्यंत म्हणजे ६६ दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली.

१ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार ३१ जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल येईल. १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. लोकसभेत दुपारी १२ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.

दोन टप्प्यांत अधिवेशन

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६६ दिवसांचे असेल. त्यात २७ बैठका होतील. यात नियमित सुट्टीचा कालावधी १४ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत असेल. त्यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पाचव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीचा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून अधिवेशनाची माहिती दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होईल. ६६ दिवसांमध्ये २७ बैठकांसह ६ एप्रिलपर्यंत हे अधिवेशन असेल. राष्ट्रपतींचे अभिभाषण, केंद्रीय अर्थसंकल्प आणि अन्य मुद्द्यांवर धन्यवाद प्रस्तावावर चर्चेसाठी उत्सुक आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply