Parbhani News : फटका सायलेन्सर्सचा राेलरखाली चुराडा, फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाईचा बडगा

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील पाेलिस दलाने कर्कश आवाज करणारे दुचाकी सायलेंसर जप्त करण्यास प्रारंभ केला. आहे. पाेलिसांनी गंगाखेड शहरातील सुमारे 57 कर्कश आवाजातील सायलेंसर जप्त केले. या सर्व सायलेंसरवर रोडरोलर फिरवून ते निकामी करण्यात आले.

गंगाखेड शहरात व हद्दीत बुलेट, मोटरसायकलला कंपनीकडून बसविण्यात आलेले सायलेन्सर काढून त्यास सुधारित करून पतियाला सायलेन्सर, फटाका सायलेन्सर व इंदौर सायलेन्सर असे कर्कश आवाजातील सायलेंसर लावण्याचा धडाका सुरु आहे. या वाहनधारकांकडून नागरिकांना त्रास हाेत असल्याची तक्रारी पाेलिसांना प्राप्त झाल्या.

Nanded Police News : शाब्बास नांदेड पोलिस! चाेरीस गेलेले 164 मोबाईल हस्तगत, 70 नागरिकांना केले परत

पाेलिसांनी अशा 57 वाहनधारकांकडून सायलेन्सर जप्त केले. ते सर्व सायलेन्सर गंगाखेड चाैकीत ठेवण्यात आले. त्यानंतर पाेलिसांनी सर्व सायलेन्सर वर रोडरोलर फिरवून ते निकामी केले. फॅन्सी नंबर प्लेट, दुचाकीवर नंबर प्लेट नसणे तसेच इतर प्रकारे मोटार वाहन कायद्याअंतर्गत नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *