Parbhani News : परभणीत आजपासून बससेवा सुरळीत, दाेन दिवसांत एसटी महामंडळाचे 65 लाखांचे नुकसान

Parbhani News : मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी आणि मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील यांच्या समर्थनार्थ परभणी जिल्ह्यात दाेन दिवस (शनिवार आणि रविवार) ठिकठिकाणी मराठा समाजाने रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन केले. यामुळे बहुतांश भागातील एसटीची वाहतूक खाेळंबली. काही भागातील फे-या रद्द झाल्या. दरम्यान गेल्या दाेन दिवसांत राज्य परिवहन महामंडळाचे 65 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. 

Maharashtra Politics : शरद पवारांना राष्ट्रवादी नाव अन् पक्षचिन्ह परत मिळणार? सुप्रीम कोर्टात आज काय होणार?

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मराठा समाजाचे विविध प्रकारचे आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान, हिंगोली व परभणी  जिल्ह्यात सलग दोन दिवस दोन बस पेटवून देण्यात आल्या.

दरम्यान शनिवारी व रविवारी या दाेन दिवसांत 4 हजार 800 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे महामंडळाला 65 लाख रुपयांचा फटका बसला. परिणामी, प्रवाशांची गैरसोय तर झालीच त्याचबरोबर एसटी महामंडळ प्रशासनालाही मोठा फटका बसला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply