Parbhani : वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी नदीत गेला, परतलाच नाही; तलाठ्यासोबत घडली भयानक घटना

Parbhani : परभणीतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. परभणीत अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेला तलाठी नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. जिंतूर तालुक्यातील डिग्रस येथे घटना घडली आहे. या घटनेतील मृत तलाठ्याचा मृतदेहाचा नदीपात्रात शोध सुरू आहे. 

अवैध वाळू माफीयांवर कारवाईसाठी गेलेले डिग्रस सज्जाचे तलाठी सुभाष होळ हे पूर्णा नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. सकाळपासून पूर्णा नदीपात्रात तलाठ्याचा शोध घेतला जात आहे.

तलाठी होळ हे आपले सहकारी तलाठ्यासोबत नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने यंत्र लावून वाळू उपसा होत असल्याचे दिसले.

नदीच्या पलीकडे असलेल्या यंत्रसामुग्रीवर कारवाईसाठी तलाठी सुभाष होळ हे नदीपात्रात उतरले. पोहोत जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. तसेच दम छाटल्याने तलाठी होळ नदीपात्रात बेपत्ता झाल्याची माहिती सोबत असलेले तलाठी व इतर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळवली आहे. सायंकाळी सहावाजेपर्यंत शोध लागला नसल्याने सर्वाना त्यांची चिंता लागली आहे.

कुटुंब चिंतेत

अवैध वाळू माफीयांवर कारवाईसाठी गेलेले डिग्रस सज्जाचे तलाठी सुभाष होळ नदीपात्राजवळ गेले होते. यावेळी त्यांना नदीच्या पलीकडे वाळू माफीयांची यंत्रसामुग्री दिसली. यामुळे होळ हे कारवाईसाठी नदीच्या पलीकडे चालले होते.

तलाठी सुभाष होळ हे पोहत जात नसताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे होळ हे पाण्यात बुडाले. ही माहिती कर्मचाऱ्यांना कळताच वरिष्ठांना कळवली. सध्या नदीपात्रात त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. तलाठी होळ हे नदीपात्रात बुडाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना चिंता लागली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply