Parbhani Accident : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् अनर्थ घडला; लग्नासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला

Parbhani Accident News : परभणी जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर-पिंपरी फाट्याजवळ भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. उत्तम मोहिते असं मृत्युमुखी पडलेल्या कारचालकाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्वजण हे धारूर येथून एका लग्नसमारंभासाठी निघाले होते.

दरम्यान, जिंतूरच्या पिंपरी गीते फाट्याजवळ आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली. या भयानक अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले.

मेहुण्याच्या लग्नासाठी पुण्याहून नांदेडला निघालेल्या संगणक अभियंता आशिष अशोकराव वैद्य यांच्या कारला परभणीजवळ मोठा अपघात झाला. यात पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर त्यांचा सहावर्षीय बालक जखमी झाला. ही घटना परभणी तालुक्यातील भारस्वाडा टी पॉइंटजवळ शनिवारी दुपारी घडली. त्यांच्या मुलावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

येत्या ३० मे रोजी आशिष वैद्य यांच्या मेहुण्याचे लग्न होते. या लग्नासाठी ते नांदेडला येत होते. आशिष वैद्य हे त्यांच्या पत्नी प्रतिभा (वय ३३) व मुलगा सात्त्विक (वय ६) हे कारने (एमएच १२ यूएस ७५६४) पुणे येथून येत असताना शनिवारी परभणीपासून जवळच भारस्वाडाच्या पुढे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार लिंबाच्या झाडावर आदळली. यात हे दांपत्य मृत्युमुखी पडले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply