Panvel News : इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी चोरी; शटर तोडून युवकाने चोरले ५४ मोबाईल

Panvel : इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या युवकाजवळ महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. यामुळे फी भरण्याची अडचण होती. हि अडचण सोडविण्यासाठी तरुणाने मोबाईल दुकानातून तब्बल ५४ मोबाईल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नवी मुंबईच्या (Panvel) पनवेलमधील एका मोबाईल शॉपमध्ये मोबाईल चोरीची घटना घडली होती. या युवकाने रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. यामध्ये त्याने मोबाईल चोरून नेले. हा प्रकार सकाळी दुकान उघडल्यानंतर लक्षात आला. यानंतर चोरीबाबत पोलिसांना (Police) माहिती देण्यात आली. नवी मुंबई गुन्हे शाखेने सिसीटीव्ही आणि तांत्रिक तपास सुरु करत एका युवकाला चोरी केल्याप्रकरणी अटक केली.

Mumbai Crime : दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास मुलाने दिला नकार, बापाने मुलाचा काटा काढला

तरुणाने दिली कबुली

तपासा दरम्यान सदर तरुण हा इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षात असून महाविद्यालयाची फी भरण्यासाठी त्याने मोबाईल शॉप दुकानात चोरी केल्याचे कबूल केले. इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी चोरट्याने ही चोरी केली असून हे महागडे मोबाईल विकून तो फी चे पैसे भरणार होता. पोलिसांनी चोरट्याकडून 41 मोबाईल जप्त केले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply