Pandharpur News : मराठा आरक्षणासाठी वारकरी आता विठुरायाच्या चरणी, जरांगे यांच्या गावातील महिलांनी देवाला घातले साकडे

Pandharpur News : राज्यभरात सध्या मराठा आंदोलन सुरु आहे.  याच पार्श्वभूमीवर वारकरी शिक्षण संस्थेचे जोगदंड  महाराज आपल्या 200  विद्यार्थ्यांसह भजन आंदोलन केले. मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. या संस्थेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे जर आरक्षण मिळालं तर या आरक्षणाचा फायदा या विद्यार्थ्यांना होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्याकडे शिक्षण घेणारे हे गोरगरीब मराठा समाजाच्या मुलांनी ज्ञानोबा तुकाराम जयघोष करीत मंदिर परिसर  दुमदुमून सोडला. 

मराठा आरक्षणासाठी शासनाकडून अद्याप ठोस निर्णय होत नसताना जरांगे यांची प्रकृती देखील खालावू लागल्याने मराठवाडा परिसरातील भाविकांना आता फक्त विठुरायाच्या आसरा वाटू लागला आहे . त्यामुळे परिस्थिती चिघळत असतानाही बीड , जालना भागातील वारकऱ्यांनी देवाच्या चरणी साकडे घालण्यासाठी अनेक अडचणी पार करीत मंदिर गाठले आहे . सध्या मराठा आरक्षणामुळे अनेक ठिकाणची एस्टी बसेस सेवा बंद आहे . त्यातच ठिकठिकाणी रास्ता रोको सुरू असल्याने प्रवास करणे अडचणीचे ठरत आहे . यामुळे विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या खूप कमी झाली असून केवळ 10 ते 15 मिनिटात देवाचे दर्शन होत आहे . 

Nashik News : मनोज जरांगे यांना पाठींब्यासाठी बडी दर्ग्यावर चढवली चादर, नाशिकमधील सर्वधर्मीय समाज बांधवांकडून दुआ पठण

 

यातूनही मराठवाडा , खानदेश या भागातील विठ्ठल भक्त अडचणींची दिव्य पार करत मराठा आरक्षणासाठी देवाला साकडे घालण्यात येत आहेत. आता राज्यकर्त्यांवर विश्वास उरला नसल्याने विठुराया तूच आरक्षण मिळवून दे असे साकडे बीड , जालना भागातून आलेले भाविक देवाला घालत आहेत. जरांगे यांची प्रकृती नीट राहून मराठा आरक्षण मिळावे यामागणीसाठी त्यांच्या गावातील महिलाही विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी आल्या आहेत .



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply