Pandharpur : आषाढी महापूजेसाठी येणा-या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार : हाेलार समाजाचा इशारा

Pandharpur : दुर्लक्षित असलेल्या होलार समाजाच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी होलार समाजाचे नेते शिवाजी जावीर यांच्या नेतृत्वाखाली आज (साेमवार) सांगोला येथे कोल्हापूर - पंढरपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील वाहतुक खाेळंबली. 

होलार समाजाचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, होलार समाज अभ्यास आयोगाची स्थापना करावी, अक्षय भालेरावच्या खुन्याला फाशी द्यावी ,नितीन रणदिवे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा यासह इतर प्रमुख मागण्यासाठी पंढरपूर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदाेलनात माेठ्या संख्येने हाेलार समाजातील समाज बांधव सहभागी झाले हाेते. 

या आंदाेलनामुळे सुमारे तासभर काेल्हापूर पंढरपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आषाढीपूर्वी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आषाढी महापूजेसाठी येणा-या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करू असा इशारा होलार समाजाचे नेते शिवाजी जावीर यांनी दिला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *