
Pandharpur : पंढरपूरच्या विठुरायाच्या भाविक भक्त मोठा आहे. लाखोंच्या संख्येने भाविक पंढपुरात दाखल होत असून आलेले भाविक विठुरायाच्या चरणी सोने- चांदीचे दागिने अर्पण करत असतात. तर एका मुस्लिम तरुणाची विठू माऊलीवर असलेली अनोखी श्रद्धा आणि भक्ती पाहण्यास मिळाली आहे. या तरुणाने विठ्ठलावर असलेल्या श्रद्धेतून आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण केला आहे.
लातूर येथील एका मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठल भक्तीचे दर्शन यातून झाले आहे. दगड फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गणी सय्यद या मुस्लिम तरुणाने विठुरायाच्या चरणावर एक लाख रुपये किंमतीचा एक किलो वजनाचा चांदीचा मुकूट अर्पण केला आहे. देव, देश आणि धर्म एक असल्याचा संदेशही सय्यद यांनी आपल्या कृतीतून दिला. मशिदीमध्ये जावून नमाज पठण करणारा गणी सय्यद शुक्रवारी थेट गाभाऱ्यात जाऊन विठुरायाच्या चरणावर लीन झाला. त्याच्या या अनोख्या विठ्ठल भक्तीचे सर्वत्र कौैतुक होत आहे. त्याच्या भक्तीने भारावलेल्या विठ्ठल मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी त्याचा सत्कार केला.
|
|
मंदिरासाठी दगड फोडून देण्याचे करतोय काम लातूर येथील मुस्लिम समाजातील गणी सय्यद हा देखील एक विठ्ठल भक्त आहे. विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरु आहे. यामध्ये त्याला मंदिरासाठी लागणारा दगड फोडून देण्याचे काम मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे मंदिरात येणे जाणे वाढले आणि तिथेच तो विठ्ठलाचा भक्त झाला. त्यातूनच तो आज धर्म आणि जातीच्या भिंती तोडून विठ्ठलाच्या पायावर एक देवाचा लाडका भक्त म्हणून लीन झाला.
सय्यद यांचे कुटुंबीय जातात कीर्तन ऐकण्यास दरम्यान आपण देवाचे काही तरी देणे लागतो; या भावनेतून त्यांनी एक लाख रुपये किंमतीचा एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. मी मुस्लिम असलो तरी, मी आणि माझे कुटुंबिय भजन, कीर्तन ऐकण्यासाठी जातो. देव एकच आहे. अंत:करणात शुद्ध भाव असला पाहिजे; अशी भावना गणी सय्यद यांनी व्यक्त केली.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

