Pandharpur : पंढरपुरात नेत्यांच्या गाड्या अडवल्या; आमदार शिंदेंच्या विरोधात आंदोलन

Pandharpur : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राजकीय नेत्यांना पंढरपुरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी यांचा ताफा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आडवला. तर माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात येथील सरगम चौकात आंदोलन केले.

भाजप आमदार समाधान आवताडे यांचाही गाडी अडवून आरक्षणाची मागणी केली. मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनामुळे आज दिवसभर शहरात तणावाचे वातावरण होते. बुधवारपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पंढरपूर शहर व तालुक्यात साखळी उपोषण सुरू केले आहे.

Supriya Sule On Narendra Modi : शरद पवार यांच्यावर नरेंद्र मोदी यांची टीका, सुप्रिया सुळे म्हणाल्या, इतना तो हक बनता है…

सुमारे ४० हून अधिक गावांनी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. आज सकाळी आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी विठ्ठल दर्शनासाठी आल्याचे समजाताच मराठा समाजाच्या तरुणांनी मंदिराजवळ नारायण स्वामी यांची गाडी अडवून त्यांच्या समोरच आरक्षण मागणीच्या घोषणा दिल्या.

मराठा समाजबांधव आक्रमक झाल्याचे पाहताच पोलिसांनी नारायण स्वामींना अन्य मार्गाने बाहेर नेले. खर्डी येथील मराठा समाजाने आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान न करण्याची शपथ घेतली आहे.

तर कौठाळी येथे मराठा समाजाच्या तरुणांनी गावातून कॅंडल मार्च काढला. आज शेगाव दुमालाव पळशी येथील ग्रामस्थांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केल्याचा ठराव मंजूर केला. येथील मराठा बांधवांनी तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांना आरक्षण मागणीचे निवेदन दिले.

आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात आंदोलन

अजित पवार यांच्या सभेत राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा निषेध म्हणून आज येथील मराठा समाज बांधवांनी आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारुन आंदोलन केले.

येथील सरगम चौकात केलेल्या आंदोलनावेळी आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. आमदार शिंदे यांनी समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा येथील मराठा समाज बांधवांनी दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply