Palkhi Sohala : पालखी सोहळा मार्गावर शंभर मीटरपर्यंत वाहने उभी करण्यास प्रतिबंध

पुणे - संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या शहरात एकत्र आल्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक सोमवारी (ता. १२) दुपारी १२ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालखी मार्गावरील दोन्ही बाजूस शंभर मीटरपर्यंत वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

अरुणा चौक ते पारशी अग्यारी आणि पालखी विठोबा चौक ते बाबासाहेब किराड पथ जंक्शन या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास बंदी राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

पालख्यांचे एकत्रित मार्ग -

पुणे- मुंबई रस्त्याने इंजिनिअरिंग कॉलेज चौक, संचेती चौक, सिमला ऑफीस चौक, वीर चाफेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, खंडुजी बाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने विजय टॉकीज चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, डुल्या मारुती चौक, नानापेठ पोलिस चौकी येथे आल्यानंतर संत तुकाराम महाराजाची पालखी अरुणा चौकमार्गे निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम करेल. तसेच, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अशोक चौकमार्गे पालखी विठोबा मंदिरात मुक्काम करेल.

वाहतुकीसाठी बंद रस्ते (कंसात पर्यायी मार्ग)

  • गणेश खिंड रस्ता- रेंजहिल चौक ते संचेती चौक (रेंज हिल्स- खडकी पोलिस ठाणे अंडरपास- पोल्ट्री चौक- जुना मुंबई-पुणे महामार्ग किंवा रेंज हिल्स- सेनापती बापट रस्ता- नळ स्टॉप चौक)

  • फर्ग्युसन रस्ता- खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (खंडोजीबाबा चौक- कर्वे रस्ता- सेनापती बापट रस्ता)

  • शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे मार्ग (गाडगीळ पुतळा - कुंभार वेस चौक-आरटीओ चौक)

  • वीर चापेकर चौक ते वाकडेवाडी भुयारी मार्ग (पोल्ट्री फार्म चौक, रेंजहिल मार्ग किंवा औंध मार्ग)

  • मॉडर्न कॉलेज रस्ता- डेक्कन वाहतूक विभाग ते थोपटे पथ चौक (घोले रोड व आपटे रोड)

  • कुंभार वेस चौक ते गाडगीळ पुतळा चौक आणि मालधक्का ते शाहीर अमर शेख चौक (कुंभार वेस- पवळे चौक- फडके हौद चौक किंवा मालधक्का चौक- नरपतगीर चौक- १५ ऑगस्ट चौक - कमला नेहरू रुग्णालय)

दिंड्यांसोबत येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

पालख्यांसह १२ जून रोजी आळंदीकडून विश्रांतवाडीपर्यंत येणाऱ्या वाहनांनी आळंदी- मरकळ - तुळापूर - फुलगाव - लोणीकंद - वाघोली- लोहगाव- येरवडा या मार्गाचा वापर करावा. इंदिरानगर, दत्तमंदिरपासून मरिआई गेटकडे जाणाऱ्या वाहनांनी साप्रस चौकी जंक्शन-चंद्रमा चौक-सादलबाबा दर्गा- पर्णकुटी चौक या मार्गाचा वापर करावा.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply