Pakistan Blast : साखळी स्फोटाने पाकिस्तान हादरला; लाहोर, कराचीसह ६ शहरांमध्ये १२ ड्रोन हल्ले

Pakistan Blast : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेश सिंदूरअंतर्गत एअर स्ट्राईक केले. या एअर स्ट्राईकद्वारे भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ नष्ट केले. भारताने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. या सदम्यातून बाहेर येत नाही तोवर पाकिस्तानला आणखी धक्के बसले आहेत. पाकिस्तान आता साखळी बॉम्बस्फोटाने हादरले आहे. पाकिस्तानच्या ६ शहरामध्ये १२ ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पाकिस्तानच्या लाहोरनंतर कराचीमध्ये साखळी स्फोट झालेत. कराची पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. कराचीमध्ये हल्ला झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, कराचीमध्ये ड्रोल हल्ला झाला आहे. ड्रोन हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. नागरिक इकडे तिकडे पळू लागले. पाकिस्तानी सैन्याने तात्काळ सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. कराचीमध्येच पाकिस्तानचा अणूबॉम्ब ठेवण्यात आला आहे.

Operation Sindoor : LoC वर पाकिस्तानच्या गोळीबारात ३ नागरिकांचा मृत्यू... ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांचा थयथयाट, भारताचं जोरदार प्रत्युत्तर

कराचीमध्ये ज्या पद्धतीने ड्रोन स्फोट करण्यात आले आहेत त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कराचीमधील स्फोट पाकिस्तानला हादरवून टाकणारा आहे कारण त्याच ठिकाणी अणुबॉम्ब ठेवण्यात आला आहे. लाहोरमधील नौदलाच्या तळाजवळ आणि कराचीतील लष्कराच्या तळाजवळ हे ड्रोन हल्ले करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानमधील कराची, गुजरांवाला, लाहोर, चकवाल , उमरकोट आणि घोटकी येथे ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. ड्रोन हल्ल्यामुळे या भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. हे ड्रोन कुठून आले याबद्दल पाकिस्तानने अद्याप काहीच माहिती दिली नाही. तसंच या ड्रोन हल्ल्याची जबाबदारी देखील कुणीच घेतली नाही. लाहोरमध्ये सर्वाधिक ३ ड्रोनने हल्ला करण्यात आला. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण १२ स्फोट झाले आहेत. लाहोरमधील एका लष्करी तळाजवळ ड्रोन स्फोट झाल्याचे वृत्त आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply