Paithan News : PM किसान योजनेचा लाभ घ्यायचं राहूनच गेलं; अपघातात शेतकरी तरुणाचा मृत्यू, आईचा घटनास्थळी आक्रोश

Paithan News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड-पैठण मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. ही दुर्दैवी घटना सोमवारी (१८ डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांकडून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करणाची प्रक्रिया सुरू होती.  

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेला तरुण पाचोड तालुक्यातील रहिवासी होता. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत नसल्याने केवायसी करण्यासाठी तो आपल्या आईला घेऊन पैठण येथे आला होता.

Manoj Jarange Patil : सरकारने दुसरा अहवाल स्वीकारला, आता मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक राहून कारवाई करावी; मनोज जरांगे पाटील

दरम्यान, पैठण येथील काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना पैठण-पाचोड मार्गावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात तरुणाच्या आईला देखील गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.डोळ्यादेखत पोटच्या लेकराचा मृत्यू झाल्याने आईने घटनास्थळी हंबरडा फोडला होता. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

भरधाव पिकअपच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

अकोला जिल्ह्यातील बाळापूर-पातूर मार्गावर सोमवारी दुपारच्या सुमारास पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. मोहन भुमरे (वय ५३) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply