नाशिक : पंचवटी विभागात हिरावाडी येथे स्वामी विवेकानंद बचतगटाच्या गुदामात सापडलेल्या जवळपास चौदा हजार किलो शासनाच्या तांदळाच्या बेहिशोबी साठ्यावर भाजप आमदार राम सातपुते यांनी लक्षवेधी सूचना मांडली असून, एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शालेय पोषण आहार पुरविताना हलगर्जी केल्याने तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी १३ ठेकेदार अपात्र ठरविले होते. त्यानंतर आमदार हिरामण खोसकर यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मध्यस्थी करत ठेकेदारांसाठी पायघड्या घालताना पन्नास टक्के बिल काढण्यासाठी प्रयत्न केले. जून २०२१ मध्ये झालेल्या बैठकीचे इतिवृत्त जानेवारी २०२२ मध्ये सादर करत तीन कोटी रुपयांचे देयके काढण्यासाठी प्रयत्न झाले. त्यापूर्वी देयके काढताना कागद रंगविण्यासाठी ठेकेदारांच्या किचन तपासणीसाठी पथक नाशिकमध्ये आले, परंतु देयके काढण्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले.
महिला बचतगटाच्या पदाधिकाऱ्यांनी हिरावाडीतील ठाकरे मळा परिसरात स्वामी विवेकानंद बचतगटाने शासनाचा १४ हजार किलो तांदूळ दडविल्याचा आरोप करत तपासणीची मागणी केली. अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन तपासणी केल्यानंतर प्रकार खरा असल्याचे समोर आले. संस्थेशी संबंधित ह्णषिकेश चौधरी यांनी तांदूळ आपलाच असल्याची कबुली देताना या संस्थेने कोरोनापुर्वी शासनाने दिलेला तांदळाचा साठा संपला व उलट दहा हजार किलो अतिरिक्त तांदूळ खरेदी करून शिजविल्याचा अहवाल दिला. मात्र, शिक्षण विभागाने पुणे येथील शालेय पोषण आहार योजनेकडे अहवाल सादर केला. शिक्षण विभागाने चौकशीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर, जिल्हा परिषदेचे पोषण आहार योजनेचे श्रीधर देवरे व प्रशांत गायकवाड या चार सदस्यांची समिती गठित केली.
पोषण आहार योजनेच्या राज्य समन्वय अधिकायांनी महापालिकेला पत्र पाठविल्यानंतर चौकशीची सूत्रे जिल्हा परिषदेकडे देण्यात आली संशयास्पद साठवणूक आमदार सातपुते यांनी लक्षवेधी सूचना मांडताना संस्थेने कोरोनापूर्वी शासनाने दिलेला तांदूळ साठा संपल्याचे व उलट स्वखर्चाने दहा हजार किलो तांदळाची खिचडी शिजविल्याचा अहवाल दिला होता. या प्रकरणात महापालिकेची फसवणूक झाली आहे. एकंदरीत सर्वच प्रकार संशयास्पद आहे. ठेकेदाराने शासनाचा तांदूळ असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार सातपुते यांनी केली आहे.हे पण वाचा-
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




