Osmanabad Name Change : धाराशिव नाही उस्मानाबाद हेच नाव वापरा, उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

Osmanabad Name Change : धाराशिव नामांतर प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ही 6 जून रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. महसूल विभाग स्तरावर बदल होईपर्यंत उस्मानाबादचं नाव बदलणार नाही, अशी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे.

तत्पूर्वी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या राज्याच्या प्रस्तावास काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने मंजुरी दिली. गृहमंत्रालयाने अधिकृत परिपत्रक जारी करत मान्यता दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply