Osho Ashram Pune : ओशो आश्रम राडा प्रकरण; १२० अनुयायांविरोधात गुन्हा दाखल

Koregaon Park Pune: काल पुण्यातील कोरेगाव पार्क स्थित ओशो आश्रमामध्ये मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली होती. ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला धुडकावून लावत ओशो अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला होता. संन्याशी माळा घालून ओशो अनुयायांनी प्रवेश केला मात्र काही वेळेपुरताच हा प्रवेश राहिला. त्यानंतर मात्र मोठा राडा आश्रमाच्या बाहेर पाहायला मिळाला. या प्रकरणी आता प्रशासनाने कठोर पाऊले उचलली असून १०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, काल ओशो आश्रमाच्या बाहेर जोरदार आंदोलन करत आश्रमात शिरण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भक्तांकडून सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्कीही झाली होती. या प्रकरणात आश्रमाच्या प्रवेशद्वारावर बेकायदा जमाव करुन आश्रमाच्या व्यवस्थापनाच्या विरुद्ध घोषणाबाजी तसेच आश्रमात प्रवेश करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी १०० ते १२० अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, ओशो आश्रमाचे व्यवस्थापन आणि अनुयायांच्या गटात वाद सुरू आहेत. याच वादातून ओशो आश्रमाच्या परिसरात बुधवारी (२२ मार्च) मोठ्या संख्येने अनुयायी जमले होते. त्या वेळी ओशो आश्रमाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करण्यात आली. बेकायदा प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply