
Mumbai : सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचे साधन नसून त्यावर अनेक व्यावसायिक मार्केटिंग साठी देखील त्याचा वापर करतात. या डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्राहकांना आकर्षित करतात. मात्र काही जण याचा दुरूपयोग देखील करतात. सोशल मीडियावर नामांकित ब्रँडच्या नावाचे फेक अकाऊंट सुरू करून ग्राहकांची दिशाभूल करत त्यांना लुबाडतात. अशीच एक घटना मुंबईतील एका तरुणीसोबत घडली आहे. नामांकित ब्रँडच्या नावाखाली सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका इंस्टाग्राम पेज वरून तरुणीने ऑनलाईन शॉपिंग केली. मात्र तिच्याकडून हजारो रुपये उकळण्यात आले आहेत. या घटनेची सविस्तर माहिती तिने सोशल मीडियावर शेअर देखील केली आहे.
व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, मुंबईतील एका तरुणीने इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'झारा फॅशन' नावाने सुरु असलेल्या एका कंपनीच्या व्हिडिओ पाहून साडी विकत घेण्याचे ठरवले. कंपनीच्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन तिने साडी बुक केली. साडीची किंमत १५०० सांगण्यात आली. मात्र बनावट कंपनीकडून या तरुणीला १९२० रुपये पाठवण्याचा मेसेज आला. या मेसेज मध्ये असे म्हटले होते की, तुमची पहिली ऑर्डर असल्याने ट्रेकिंग उपलब्धतेसाठी तुम्हाला १९०० आणि २० रुपये असे वेगवगेळ्या स्वरूपात पाठवावे लागतील. हे पैसे तुम्हाला रिफंड दिले जातील. तरुणीचा विश्वास संपादन झाल्याने तिने कंपनीला पैसे पाठवले.
|
Pune : मोठी बातमी! कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ नाव देण्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर |
त्यानंतर या बनावट कंपनीने तरुणीला फोन करून सांगितले की, तुमचे पैसे आमच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यानुसार कंपनीने बनावट व्हिडिओ देखील पाठवला. शिवाय रिफंड करण्यासाठी आणखी ४११६ रुपये पाठवा असे देखील कंपनीने सांगितले. मात्र तरुणीने नकार दिल्यानंतर तिचा फोन नंबर ब्लॉक करण्यात आला.
शिवाय तिच्या खात्यातील ६ हजार रुपये गेले असल्याची माहिती आहे. आपली फसवणूक झाली असल्याचं समजताच तरुणीने जवळच्या विरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी संबंधित बनावट कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला असून तरुणीला पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. पोलीस तपासात हे कनेक्शन गुजरातमधून समोर आलं आहे. दरम्यान तुम्ही देखील अशा प्रकारच्या बनावट ऑनलाईन कंपनीकडून खरेदी करताना सावधता बाळगा.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Mumbai : स्वस्त साडीची ऑफर महागात; फसवणुकीला बळी पडताच खातं रिकामं—तरुणीसोबत नेमकं काय घडलं?”