Onion Market : कांदा दराबाबत शेतकरी संतप्त; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव पाडला बंद

Onion Market : लासलगावसह देशांतर्गत कांद्याची मोठी आवक विक्रीसाठी दाखल होत असल्याने लासलगाव बाजार समितीत गेल्या दहा दिवसात कांद्याच्या बाजारभावात २५०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. यावेळी लासलगाव येथील बाजार समितीत सकाळी शेतकऱ्यांनी कांद्याचे होणारे लिलाव बंद पाडले आहेत.

मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे कांद्याचे सरासरी बाजार भाव सोळाशे ते सतराशे रुपयांपर्यंत कोसळल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. यामुळे लासलगाव येथे शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पडून आपला निषेध व्यक्त केला आहे.

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात १२ शेळ्यांचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना, जुन्नरमध्ये संरक्षणासाठी मेंढपाळांना सोलर लाईटसह टेन्ट

कांदा निर्यातीवर असलेले २० टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करत विक्री झालेल्या कांद्याला एक हजार ते दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केली. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात ८०० वाहनातून कांद्याची आवक दाखल झाली. कांद्याला जास्तीत जास्त २५०१ रुपये, तर कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी २७०० रुपये भाव मिळाला. प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाल्यामुळे दररोज कांद्याच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सोलापुरातही कांदा लिलाव बंद

दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी पुकारलेल्या बंदनंतर प्रशासन आणि कामगारांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर देखील माथाडी कामागर आज दिवसभर काम करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. दरम्यान आज सोलापुरात कांद्याचे लिलाव होणार नाही. माथाडी कामगार काम करणार नसल्याने आज दिवसभरात कांद्याचे लिलाव होणार नाही. मात्र शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला कांदा संध्याकाळनंतर उतरवून घेतला जाणार आहे. मात्र कांद्याचे लिलाव उद्या सकाळी नेहमीप्रमाणे होणार आहेत.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply