Nylon Manja : नायलॉन मांजाची विक्री; नाशिकमध्ये ५ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, कल्याणमध्येही ६ जणांवर गुन्हा

Nashik : मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंग राज्यभरासह देशभरात उडवले जातात. मात्र यात वापरण्यात येणाऱ्या चायनीज नायलॉन मांजामुमुळे अनेक घटना घडून अनेकांनी आपला जीव देखील गमावला आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील विक्री केली जात असताना कल्याण- डोंबिवलीमध्ये ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नाशिकमध्ये ५ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंग राज्यभरासह देशभरात उडवले जातात. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जात असतो. हा मांजा धोकेदायक ठरत असून अनेकजण जखमी तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी घातली आहे. तरी देखील याची विक्री व वापर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवणार का? पुढील ५ दिवसात कसे असेल वातावरण?

कल्याण- डोंबिवलीतील पोलीसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून मांजा विक्रेत्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. कल्याण- डोंबिवलीतील एकूण सहा जणांविरोधात नायलॉन मांजा विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी हा मांजा नागरिकांसाठी धोकादायक आहे; अशा प्रकारचा मांजा कुणी विक्री करताना किंवा वापर करताना आढळून आल्यास गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

नाशिकमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

जीवघेणा नायलॉन मांजामुळे मागील काही दिवसात नाशिकमध्ये १९ घटनांमध्ये अनेक जण गंभीर जखमी यामुळे पोलीस अक्शन मोडमध्ये आहेत. नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवरील कारवाईला वेग आला आहे. यात पोलिसांनी ५ नायलॉन मांजा विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आत्तापर्यंत ७४ नायलॉन मांजा विक्रेत्यांना पोलिसांनी तडीपार केले आहे. दरम्यान रविवारी नाशिक पोलिसांनी ३ ठिकाणी छापे टाकत १ लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यांसह आता नायलॉन मांजा वापरणारे देखील रडारवर असून थेट इमारतींच्या टेरेसवर जाऊन तपासणीचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply