राज्यातील विविध भागांत दुष्काळी परिस्थितीचे सावट असताना आणि आर्थिक समीकरणांची आव्हाने असताना, देशातील सर्वात महत्त्वाचे ऑटोमोबाईल व इंजिनिअरिंग हब मानल्या जाणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीत (Chakan MIDC) मात्र मंदीचा कोणताही प्रभाव पडलेला नाही. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नामांकित बहुराष्ट्रीय आणि भारतीय कंपन्यांनी कामगारांसाठी ३०,००० रुपये ते ५५,००० रुपयांपर्यंतचा भव्य दिवाळी बोनस (Diwali Bonus) जाहीर केला आहे. यामुळे सणासुदीच्या काळात कामगारांच्या हातात मोठा आर्थिक आधार मिळाला असून संपूर्ण औद्योगिक पट्ट्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
बड्या ऑटोमोबाईल कंपन्यांचा मोठा आर्थिक आधार:
चाकण एमआयडीसी परिसरात ५ हजारांपेक्षा जास्त कंपन्या कार्यरत असून सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक कामगार येथे रोजगारासाठी कार्यरत आहेत. यामध्ये बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, मर्सिडीज-बेंझ, स्कोडा, फोक्सवॅगन, सॅनी इंडिया, ब्रिजस्टोन, फोर्स मोटर्स, ह्युंदाई, बॉश, जीई आणि गॅब्रिएल यांसारख्या आघाडीच्या वाहननिर्मिती व अभियांत्रिकी कंपन्यांचा समावेश आहे. वेतन करारानुसार आणि उत्पादकतेनुसार मोठ्या कंपन्यांनी कामगारांना ३० हजार ते ५५ हजार रुपये किंवा २० टक्क्यांपेक्षा जास्त बोनस दिला आहे. तर इतर मध्यम व लहान उद्योगांमध्ये कामगारांना नियमानुसार एका महिन्याच्या वेतनाइतका (८.३३ टक्के) बोनस, भेटवस्तू (Diwali Gifts) आणि खरेदीसाठी मॉलमधील कूपन्स देण्यात आले आहेत.
वाढत्या महागाईच्या काळात कामगारांना मोठा दिलासा:
वाढती महागाई, अन्नधान्य, भाजीपाला, शिक्षण आणि घरभाड्याचा खर्च भागवताना कामगारांना नियमित पगारात कसरत करावी लागत होती. अशा वेळी दिवाळी बोनसच्या रूपाने मिळालेल्या या रकमेमुळे कामगारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. या बोनसच्या पैशांमधून कामगार सणासुदीची खरेदी, कौटुंबिक नियोजन, मुलांचे शैक्षणिक खर्च आणि इतर आर्थिक गरजा पूर्ण करत आहेत. स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी औद्योगिक क्षेत्रात उत्पादन आणि काम उत्तम राहिल्याने कंपन्यांनी कामगारांच्या मेहनतीचा योग्य मोबदला देत त्यांना भरघोस बोनस दिला आहे, ज्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




