Nitish Kumar : नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Nitish Kumar : बिहारमधील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय.

इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का

काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीमध्ये जेडीयू पक्ष देखील होता. भाजपला हरवण्यासाठी सर्वपक्षांसह जेडीयू देखील इंडिया आघाडीसह एकत्र आले होते. मात्र आता नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्याने जेडीयू पुन्हा भाजपसोबत जात आहे. इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Maratha Reservation : पुण्यात मराठा सर्वेक्षणाला वेग: ‘एवढ्या’ कुटुंबांची माहिती झाली संकलित

नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

आम्ही नेहमीच जनतेसाठी काम केलं. महाआघाडीत परिस्थिती योग्य नसल्याने मी राजीनामा दिला आहे. तसेच नव्या इंडिया आघाडीतून बाहेर पडलो आहे, अशी प्रतिक्रिाया नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *