Nikki Yadav Case : सकाळी प्रेयसीची हत्या, फ्रीजमध्ये ठेवला मृतदेह, संध्याकाळी दुसरीसोबत लग्न; निक्की हत्याकांडात धक्कादायक खुलासा

Nikki Yadav Case : दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणे आणखी एका हत्याकांड समोर आल्याने खळबळ उडाली आहे. श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला प्रमाणेच साहिल गहलोत आणि निक्की यादव लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. बाबा हरिदास नगर भागात निक्की यादवची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह एका ढाब्यातील फ्रीजमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.  

पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी प्रियकराने आपल्या लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आता या आरोपीने केवळ गुन्हाच केला नाही तर त्याच दिवशी संध्याकाळी त्यानं दुसऱ्या तरुणीसोबत लग्नगाठ  बांधली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी साहिलला अटक केली आहे.

10 फेब्रुवारी रोजी निक्कीची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल गेहलोतने 10 फेब्रुवारी रोजी निक्कीची हत्या केली होती. निक्कीला कळलं होत की साहिल दुसऱ्या मुलीशी लग्न करणार आहे. साहिलला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताच प्रकरण वाढले आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्या वादामुळे साहिलला राग आला आणि त्याने नक्कीचा गळा आवळून खून केला. 

त्यानंतर तिचा मृतदेहासोबत अनेक तास कारमध्ये फिरत राहिला आणि त्यानंतर बाबा हरिदास पोलीस ठाण्याजवळील एका ढाब्यावर फ्रीजमध्ये तिचा मृतदेह लपवून ठेवला. निक्कीला साहिलसोबत लग्न करायचं होतं, पण साहिलचे कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. साहिलला कुटुंबीयांच्या विरोधात जायचं नव्हतं. त्यामुळे त्यानं दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करायचं ठरवलं.

चौकशीदरम्यान पोलिसांना केवळ दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली नाही तर निक्की आणि साहिल दोघेही बरेच दिवस लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचेही समोर आले. खरंतर निक्की आणि साहिल दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply