NIA Raid in Pune and Amravati : एनआयएची पुणे, अमरावतीत छापेमारी; शिक्षकाच्या मुलासह दोन तरूण ताब्यात

NIA Raid in Pune and Amravati : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुणे आणि अमरावती येथून दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. अमरावतीच्या अचलपूर शहरमध्ये मध्यरात्री NIAने छापेमारी केली. तर पुण्यातील गुलटेकडी परिसरात NIA छापा टाकला. 

पुण्यातून एनआयने १९ वर्षीय साफवान शेख या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून त्याची चौकशी सुरु आहे. पुलगेटच्या अरिहंत कॅालेजचा हा विद्यार्थी आहे. त्याच्याकडून मोबाईल आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहेत. साफवान बंगळुरुमधील इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम गृपमध्ये सहभागी असल्याने चौकशी सुरु आहे. 

NIA च्या कर्नाटकातील बंगळुरुमधील पथकाने ही कारवाई केली आहे. छाप्यात NIA ने संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. गेल्या आठवड्यात मुंबई पुणे आणि राज्यभरात NIAच्या छापेमारीनंतर आज पुण्यात मोठी छापेमारी सुरू आहे. पुण्यातील कोथरुड भागात 18 मे रोजी दोन अतिरेक्यांना अटक केली होती. गेल्या आठवड्यात 15 संशयितांना ठाणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं.

अमरावतीतूनही एक विद्यार्थी ताब्यात

अमरावतीमध्येही एनआयएने मोठी कारवाई केली आहे. एका शिक्षकाच्या मुलाला एनआयने ताब्यात घेतलं आहे. विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला असावा असा संशय NIA ला आहे. सध्या अमरावती येथील जोग क्रीडा संकुल पोलीस मुख्यालयामध्ये त्याची कसून चौकशी सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply