New Zealand Earthquake : टर्कीपाठोपाठ न्यूझीलंडही हादरलं, ६.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के

न्यूझीलंडमध्ये बुधवारी (१५ फेब्रुवारी) ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला. EMSC ने दिलेल्या माहितीनुसार लोअर हटपासून ७८ किलोमीटर वायव्येला भूकंपाचे हादरे बसले. न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७.३८ वाजता भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचं केंद्र पारापारामूपासून ५० किलोमीटर वायव्येला आणि ७६ किलोमीटर खोल होतं. वेलिंग्टनच्या दोन्ही बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची सुरुवात एका जोरदार हादऱ्याने झाली आणि त्यानंतर सलग ३० सेकंदां भूकंपाचे छोटे धक्के बसत होते.

यूरोपियन-मेडिटेरेनियन सीस्मोलॉजिकल सेंटरने (EMSC) दिलेल्या माहितीनुसार वेलिंगटनच्या जवळ लोअर हटपासून ७८ किमी वायव्येला भूकंपाचे हादरे बसले. स्थानिक सरकारच्या भूकंपीय मॉनिटर जियोनेटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के ४८ किमी खोल होते.जियोनेटने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के संपूर्ण देशभरात जाणवले. या भूकंपामुळे किती नुकसान झालं आहे याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

चक्रीवादळानंतर भूकंपाचं संकट

न्यूझीलंडला मोठ्या चक्रीवादळाने काल रात्रीपासून झोडपलं आहे. देश यामधून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भूकंपाचं मोठं संकट देशावर उद्भवलं आहे. गॅब्रियल चक्रीवादळाने न्यूझीलंडमध्ये मोठी वित्तहानी झाली आहे. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा जीव दगावला आहे, तसेच १०,५०० लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply