New India Cooperative Bank Scam : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, भाजप नेत्याच्या भावाला अटक

New India Cooperative Bank Scam : १२२ कोटींच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या घोटाळा प्रकरणात भाजप नेत्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे. जावेद आझमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जावेद आझम भाजपचे माजी महाराष्ट्र सचिव हैदर आझम यांचा भाऊ आहे. या घोटाळा प्रकरणातील ही सातवी अटक आहे.

मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सातवी अटक करण्यात आली आहे. भाजप नेत्याचा भाऊ जावेद आझमला आज अटक करण्यात आली. जावेद आझमला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Nagpur Violence : ...हा तर नवा दंगल पॅटर्न, नागपूर हिंसाचारावरून संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

या घोटाळा प्रकरणात सहावा आरोपी अुणाचलम उल्हानाथन मरूथुवर हा रविवारी मुंबई पोलिस आयुक्तालयात शरण आला. उल्नाथन अरुणाचलमच्या चौकशीत जावेद आझमचे नाव समोर आल्याने जावेद आझमला आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बाजवले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याला अटक केली. या घोटाळ्यातील रक्कमेतील १८ कोटी रुपये जावेदला दिल्याचा अरुणाचलमने दावा केला आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक लुटली गेली असून त्यामागे सर्व भाजपचे लोक आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. जॉर्ज फर्नांडिस यांनी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापन केली होती.

'बँकेतून लुटला गेलेला पैसा हा गरीबांचा, सामान्य माणसांचा नाही का? आता तुमच्याकडे कागदपत्र, पुरावे नाहीत का? आता ईडीकडे तुम्ही का नाही जात? आता तुम्ही पत्रकार परिषद होत नाहीत?', असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. तसंच, 'भाजपचे आमदार यामध्ये अडकले आहेत. त्यांच्या दबावाखाली कर्जवाटप झाले.', असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply