नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड केस मध्ये ED ने काँग्रेस नेते राहुल गांधींना दिली नवी तारीख

नवी दिल्ली : नॅशलन हेराल्ड प्रकरणात आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने नवीन समन्स बजावले आहे. त्यांना आता चौकशीसाठी पुढची तारीख दिली आहे. याअगोदर त्यांना ईडीने २ जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते. आता ईडीने ही तारीख बदलून ८ जून केली आहे. यासाठी ईडीने दुसऱ्यांदा राहुल गांधी यांनी समन्स बजावले. राहुल गांधी सध्या देशाच्या बाहेर आहेत. त्यामुळे त्यांनी ईडीला तारखेत बदल करण्यासाठी अपिल केली होती. यावर आता ईडीने बदल करुन पुढील तारीख दिली आहे. 

राहुल गांधी ५ जूननंतर देशात येणार आहेत. त्यामुळे त्यांनी ईडीला पुढाची वेळ मागण्यासंदर्भात अपिल केली होती. ईडीने अगोदर नॅशनल हेराल्ड संदर्भातील चौकशीसाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना १ जून रोजी समन्स बजावले होते. सोनिया गांधी यांना ईडीने ८ जूनला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. तर राहुल गांधी यांना २ जून रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.

काँग्रेस नेते सध्या बाहेरच्या देशात आहेत. त्यांनी ईडीने अपिल करुन तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली होती.राहुल गांधी  ईडीने दिलेल्या तारखेला ईडीसमोर हजर होतील, असं काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे.

ईडी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची मनी लॉड्रिंग संदर्भात चौकशी करुन त्यांचे स्टेटमेंट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण नॅशनल हेराल्ड संदर्भात आहे. यात मनी लॉड्रिंग झाले असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात गेल्या काही दिवसापासून चौकशी सुरू आहे.

ईडीने काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे आणि पवन बंसल यांची चौकशी केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची चौकशी करुन नॅशनल हेरॉल्ड संदर्भात झालेल्या मनी लॉड्रिंग संदर्भात चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडची आयकर विभागाने चौकशी केली होती. यावरुन त्यांच्यावुरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply