Vande Bharat Cockroach: 'वंदे भारत' प्रिमियम ट्रेनमध्ये जेवणात आढळलं झुरळ ! प्रवाशानं थेट अश्विनी वैष्णव यांच्याकडं केली तक्रार

New Delhi  : 'वंदे भारत या भारताच्या प्रिमियम ट्रेनसंदर्भातील अनेक तक्रारी यापूर्वी आलेल्या आहेत. यामध्ये पावसाळ्यात गळणारे डबे तर रेल्वे ट्रॅकवर आलेल्या भटक्या जनावरांमुळे झालेलं ट्रेनचं नुकसान या गोष्टींचा समावेश आहे. त्यात आता या ट्रेनमधील जेवणात झुरळ आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

पण विशेष म्हणजे ज्या प्रवाशाच्या जेवणात हे झुरळ आढळून आलं त्यानं थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून रेल्वेच्या केटरिंग व्यवस्थेवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली. 
भोपाळहून आख्याला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये मंगळवारी हा प्रकार घडला आहे. विदित वष्र्णे यांनी यासंदर्भात आपल्या नातेवाईकांच्यावतीनं तक्रार करणारी पोस्ट फोटोसहित सोशल मीडियावर लिहिली. यामध्ये एक मृत झुरळ भाजीमध्ये आढळलेला फोटो शेअर केला आहे. ही तक्रार त्यांनी आयआरसीटीसीला देखील टॅग केली. विशेष म्हणजे ज्या जोडप्याच्या जेवणात झुरळ आढळलं त्यांनी थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याना संपर्क केल्याची माहितीही मिळतेय. तसेच या प्रकाराबद्दल केटरिंग कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Sindkhed Raja: राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोर उत्खननात सापडली शेषशायी विष्णूची सुबक मूर्ती !


दरम्यान, आयआरसीटीसीनं वर्णे यांच्या तक्रारीची गुरुवारी दखल घेतली. प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, तुम्हाला प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेण्यात आली असून योग्य तो दंड सेवा देणाऱ्या कंपनीला ठोठावण्यात आला आहे.

आम्ही केटरिंग सेवा अधिकाधिक काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करु, वर्णे यानी पुढे असंही म्हटल की, आमचे काका आणि काकू हे लकी ठरले की त्यानी हे झुरळ नकळत का होईना खाल्ल नाही, पण ज्या भांड्यामध्ये ही भाजी तयार केली गेली ही भाजी इतर प्रवाशानी खाल्लीच असेल.
दरम्यान, असाच प्रकार सिलिगुडी ते लोककाता या वंदे भारत ट्रेनमध्ये मार्च महिन्यात घडला होता. यामध्ये एका प्रवाशाला रेल्वेत मागवलेल्या दालमध्ये झुरळाचा पाय आढळून आला होता. पण त्यावेळी त्यांनी कोणतीही तक्रार किंवा नुकसान भरपाई मागितली नव्हती पण अधिकाऱ्याऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी असा सल्ला दिला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply